Monday, October 25, 2021

आता राधाकृष्ण विखे ही लढाई सुरु करणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायद्याची लढाई पुन्हा सुरु करणार असून पाण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडून पाण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्ह्याचे

मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु जिल्ह्यातील कुठलाही नेता यावर बोलायला तयार नाही. समन्यायी पाणी वाटप कायदा मंजुर होत असतानाही अनेक जण गप्प बसून राहिले.सत्ता गेल्यानंतर एक थेंबही पाणी जावू देणार नाही अशा वल्गना करीत होते.

आता सत्तेत गेल्यानंतर या विषया संदर्भात त्यांनी पुन्हा गप्प बसण्याची भूमिका घेतली असल्याकडे लक्ष वेधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत. त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करुन घेण्याबाबतचे दायित्व पूर्ण करायला हवे होते.

परंतु स्वत:ला मोठे समजणारे नेते मात्र जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत काहीच करताना दिसत नाहीत, अशी टीकाही आ. विखे पाटील यांनी केले.या कायद्याच्या विरोधात शेवटपर्यंत न्यायालयील लढाई आपण लढलो. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही सुचना खालच्या न्यायालयाला दिल्या होत्या.

याबाबत आता पाठपुरावा करुन पुन्हा ही लढाई सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता असो अथवा नसो हक्काच्या पाण्याची लढाई करण्याची शिकवण आदरणीय खासदार साहेबांनी आम्हाला दिली. पाणी प्रश्नावर त्यांनी कधी तडजोड केली नाही.

भाजप सरकारच्या काळातही पाणी प्रश्नाबाबत चुकीच्या निर्णयांना आपण विरोधच केला असे विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!