Sunday, October 24, 2021

त्रिपक्षीय समितीची अंतिम बैठक संपन्न…साखर कामगार वेतनवाढ करारावर स्वाक्षरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर मागण्यांवर निर्णय घेण्याकरिता नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची अंतिम बैठक आज पुणे येथील साखर संकुलात संपन्न झाली.साखर कामगार 12 टक्के वेतनवाढ देण्याच्या करारावर समिती सदस्यांनी स्वाक्षरी केली असल्याने शासन निर्णय निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज सोमवार दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे येथे साखर संकुलामध्ये राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे तथा त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय सदस्यांची अंतिम बैठक संपन्न झाली.राज्यातील साखर कामगारांना दिलेल्या 12 टक्के वेतनवाढीचा अंतिम शासन निर्णय निघण्यासाठी या करारावर सर्व त्रिपक्षीय सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात, त्या आज प्राप्त झाल्यामुळेशासन निर्णय निघण्याचा मार्ग सुकर झाला असून तो राज्यातील सर्व साखर कारखान्यांना लवकरच प्राप्त होईल.

या बैठकीस कारखाना प्रतिनिधी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीराम शेटे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त रविराज ईळवे, अशोक कारखान्याचे भानुदास मुरकुटे, श्रीगोंदा कारखान्याचे राजेंद्र नागवडे,कामगारांचे प्रतिनिधी म्हणून राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, शंकरराव भोसले, महासंघाचे सरचिटणीस आनंद वायकर,अशोक बिराजदार , डी.डी. वाकचौरे,राऊ पाटील,नेवासा तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, फेडरेशनचे खजिनदार डी.एम. निमसे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात उद्यापासून खडी क्रशर, खाणपट्टा सोमवारपासून बंद ?

माय महाराष्ट्र न्यूज: खडी क्रशर, खाणपट्टा धारकांवर जाचक अटी राज्य सरकारकडून घातल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात रॉयल्टी दर कमी करण्याची मागणी...

नगर जिल्ह्यात आज २२६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ११५ इतकी...

सोन्याच्या भाव आता 50 हजारांकडे

माय महाराष्ट्र न्यूज :भारतीय परंपरेनुसार, सोन्याकडे गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सणासुदीत शुद्ध सोन्याचे वेढ किंवा मणी घेण्याची प्रथा आहे. आता मात्र बहुतांश...

आता आमदारकीचे स्वप्न चुकूनही पाहू नका.. शिवसेनेच्या या नेत्यांचा माजी मंत्री कर्डिलेंना टोला

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात महाआघाडी सरकार आहे . जिल्हयातील आघाडीचे तीनही मंत्री जनतेच्या प्रश्नासाठी दिवस रात्र झटत आहे . येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही...

नगर ब्रेकिंग: या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले फाईल व कागदपत्रे जाळली

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक आक्रमक भूमिका घेतली. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे...

नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता सेक्स रॅकेट;तरुणींनी सांगितला भयंकर अनुभव

माय महाराष्ट्र न्यूज:मुरादाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलं आहे. येथे भाड्याने घर घेऊ सेक्स रॅकेट . रॅकेट चालविणारी व्यक्ती ही नोकरीच्या नावावर तरुणींची फसवणूक...
error: Content is protected !!