Sunday, October 24, 2021

सरपंच दिनकर गर्जेवर खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील आदर्शगाव वडुलेचे विद्यमान सरपंच दिनकर गर्जे यांचे नाव जाणूनबुजून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले असून जाणूनबुजून सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करून त्यांना बदनाम करण्याचा व मानिसक त्रास देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे असे निवेदन नेवासा तालुका सरपंच संघटनेने पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना दिले.

सरपंच संघटनेने निवेदनात म्हंटले आहे की, वडुले येथील नामदेव भिमाजी नरोटे या फिर्यादीच्या तक्रार अर्जाचा बारकाईने अभ्यास केला असता आदर्श गाव वडुले येथील विद्यमान सरपंच दिनकर गर्जे यांचा कसलाही संबंध दिसून येत नाही. नामदेव भिमाजी नरोटे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गर्जे यांच्यावर थेट कोणताही आरोप करण्यात आलेला नाही, गर्जे यांचा कोणत्याही प्रकारे थेट हस्तक्षेप दाखवलेला नाही. नरोटे यांच्याच जबाबानुसार घरी आलेल्या व्यक्तींमध्ये गर्जे यांचा सहभाग नव्हता.तालुक्यात सद्यस्थितीत सुरु असलेले गलिच्छ राजकारण, प्रतिष्ठीत व्यक्तींना विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवणे, त्यांची जनतेत जाणूनबुजून बदनामी करणे, गुन्ह्यात अडकवून विनाकारण कोर्ट कचेरीच्या चकरा मारायला लावून मनस्ताप घडविणे हाच हेतू प्रामुख्याने दिसून येतो. याआधी देखील नेवासा तालुक्यात मौजे चीलेखनवाडीचे सरपंच व इतर गावातील काही सरपंच यांच्याबाबतीत सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत.त्यामुळे पोलिसांनी
नामदेव भिमाजी नरोटे यांची सविस्तर चौकशी केली तर असे निदर्शनास येईल कि नरोटे यांचे आसपास राहणारे शेजारी, जवळचे नातलग, स्वतःचे भाऊ, इतर गावकरी यांच्याविरोधात कायम वाद आहेत. वडुले गावातील सर्वाधिक भांडखोर, गुंड प्रवृत्तीची व्यक्ती अशीच ओळख नरोटे यांची पंचक्रोशीत आहे. कोणत्याही कारणास्तव भांडण करायचे आणि थेट पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायची व त्याच अर्जात जाणूनबुजून श्री.गर्जे यांचे नाव टाकायचेच अशी वाईट सवय नरोटे यांना आहे.

एकंदरीत फिर्यादीमध्ये कुठेही आदर्श गाव बहुले येथील विद्यमान श्री. दिनकर गर्जे यांचा कसलाही संबंध दिसून येत नाही. प्रत्यक्षात आज अखेर फिर्यादि विरोधात दिनकर गर्जे यांनी कसलाही गुन्हा दाखल केलेला नाही, कोणताही दावा दाखल केलेला नाही. तर फिर्यादीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून याआधी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल असून दिनकरराव गजें यांचा कुठेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप दिसुन येत नाही. दिनकर गर्जे यांचा कसलाही संबंध दिसून येत नाही. अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या लोकसेवकाला अश्या प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवणे जणू नवीन फॅशन झालेली आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो.

जर संबंधित प्रकरणी घटना दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8:20 वाजता घडली तर मग गुन्हा दाखल करण्यासाठी दि.30 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत वाट का पहावी लागली? दिनकर गर्जे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आलेला होता का असा प्रश्न उपस्थित होतो. फिर्यादीमध्ये दिनकर गर्जे हे घटनास्थळी हजर असल्याचा प्रत्यक्षात फिर्यादींना त्रास देण्यासाठी स्वतः उपस्थित असल्याचे कुठेही दिसत नाही. जर फिर्यादी हा मूळ गावचा रहिवासी आहे तर मग त्याने इतर आरोपींची संपुर्ण नावे टाकली तसेच सरपंच दिनकर गर्जे हे अर्धवट कुणाच्या सांगण्यावरून अथवा दबावापोटी टाकले हे नजरेआड करण्याजोगे नाही.
अश्या प्रकारे विनाकारण वारंवार खोटे गुन्हे दाखल करणाच्या खोटी फिर्याद लिहून देणाऱ्या शासकीय यंत्रणेचा जाणूनबुजून दुरुपयोग करणाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंड व्यक्तीवर शासकीय नियमानुसार कारवाई व्हावी, सविस्तर चौकशीअंती नरोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षा सौ.प्रज्ञा सोनटक्के, सचिव सौ. प्रियंका शरद आरगडे,सदस्य भाऊसाहेब सावंत, सुनील खरात,छाया काळे,संदीप कापसे,राजेंद्र पंडित,सचिन नागोडे,अर्चना काळे,वैशाली शिंदे,वनमाला चावरे,अश्विनी औताडे,सुशीला लहारे, रंजना आहेर,मंगल खरात,सुजाता म्हसरूप,संगीता थोरे, संतोष लिपणे,सुनंदा दराडे,महेश म्हस्के,राजश्री तनपुरे या सरपंचाच्या सह्या आहेत.

 

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!