Monday, October 25, 2021

नेवासा भाजपची मागणी;ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 25 हजारांची नुकसान भरपाई द्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाने नेवासा तहसीलदारांकडे केली आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली भाजपाचे शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.त्यात म्हंटले आहे की,राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे व शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदरील परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी विमा कंपनी तसेच शासकीय अधिकारी यांची असते. परंतु हे कुठेच दिसत नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणे गरजेचे आहे. नेवासा तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे सोंगनीला आलेली सोयाबीन, मका, उडीद, मुग, बाजरी, कापूस इत्यादी पिके, हुमणी अळी मुळे ऊस पिक तसेच फळबागा इ.चे अतोनात नुकसान झालेले आहे. खरीप पूर्ण वाया गेले आहे. त्यामुळे या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून खरीपासाठी हेक्टरी 25 हजार रुपये, तसेच फळबागांसाठी हेक्टरी 45 हजार रुपये नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने कुठल्याही अटी न लावता तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावीत. या मदतीतून कुठलीही जुनी दे-बाकी वसूल करू नये. सद्यपरिस्थिती बिकट असल्याने हि परिस्थिती हाताळण्यासाठी शेतकऱ्यांना या मदतीची गरज आहे. तसेच अनेक शेतकरी हे अल्प भूधारक असल्याने मदत हेक्टरी न करत एकरी स्वरुपात करावी सदर मदत हि तात्काळ शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अंकुश काळे, नितीन दिनकर ,भाऊसाहेब फुलारी, प्रताप चिंदे, मनोज पारखे, भाऊ नगरे, आदिनाथ पटारे , अण्णा भाऊ गव्हाणे, प्रतीक शेजुळ, देविदास साळुंके, रितेश भंडारी, पोपट शेंडगे, हाडुळे अजय, काकडे पाटील आदी उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!