Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात हा कारखाना ठरला एक नंबर :उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंधन क्रांतीची महती काल नगर येथील एका कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कथन केली. तथापी इथेनाॅलच्या पंपाच्या उभारणीपासून ते त्याचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांसमोरील अनेक अडचणी दूर करण्याचे आवाहन

केंद्र व राज्य सरकारला स्वीकारावे लागणार आहे. इथेनाॅल खरेदीची हमी व शाश्वत भाव केंद्र सरकाने बांधून दिले. तथापी साखर वर्तूळात इथेनाॅल प्लॅंटची उभारणी म्हणजे ‘दमडीची कोंबडी आणि रूपयाचा मसाला’ असे गमतीने म्हटले जाते. कारण इथेनाॅल निर्मिती प्लॅंटला साधारण चार कोटीचा खर्च येतो.

त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जो इन्सिरेशन बाॅयलर उभारावा लागतो, त्याची किंमत आहे चाळीस कोटी रूपये. याचा अर्थ असा की जिल्ह्यातील सर्व इथेनाॅल प्रकल्पांना मध्यवर्ती ठरेल, असे इन्सिरेशन बाॅयलर केंद्र व राज्य सरकारला उभारून द्यावे लागतील.हे काम कारखान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. त्यातही आणखी एक अडचण

अशी की इथेनाॅल प्लॅंट सलग तीस वर्षे उत्तम चालतो. मात्र हा इन्सिरेशन बॉयलर तीन वर्षात खराब होतो. तेल कंपन्यांकडे इथेनाॅल साठविण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळे कारखान्यांचे इथेनाॅलने भरलेले टॅंकर त्यांच्या तेल डेपोसमोर दोन ते तीन दिवस उभे रहातात. खर्चाचा ताळमेळ बसत नाही.

तेल कंपन्यांनी इथेनाॅल साठवण क्षमता युध्दपातळीवर वाढविणे गरजेचे आहे. साठवण क्षमता पुरेशी झाली व इन्सिरेशन बाॅयलर सरकारने उभे करून दिले तरच इथेनाॅल निर्मितीला वेग येऊ शकेल.जे कारखाने जुन्या तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने गाळप करतात त्यांच्यापुढे तर आणखी वेगळ्याच अडचणी आहेत.

ज्या कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत. त्यांना इथेनाॅल निर्मितीकडे वळणे तुलनेत सोयीचे आहे.उसाच्या फडात पेट्रोल (इथेनाॅल) तयार होणार, त्यावर वाहने धावणार व उसाला अधिक भाव मिळणार. हे केंद्रातील मोदी सरकारचे स्वप्न अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार

स्नेहलता कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने प्रत्यक्षात आणले. या कारखान्याने नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे थेट उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मिती केली. ऊस उत्पादकांना एफआरपीच्या तुलनेत प्रतिटन तीनशे रूपये दर अधिक दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!