Monday, October 25, 2021

सिस्टर बिंदू व सिस्टर जोसी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा ज्ञानमाऊली चर्च धर्मग्रामातील सिस्टर बिंदु जोसेफ व सिस्टर जोसी जोस यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती परिषदेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले,नेवासा ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव,फादर जॉन गुल देकर,परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम,जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, जिल्हा परिषद समाजकल्याणचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे,भाऊसाहेब तोरणे,तालुकाध्यक्ष पत्रकार कमलेश गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अनिल भोसले म्हणाले,गरीब व गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपत सिस्टर बिंदू व सिस्टर जोसी यांनी केलेले कार्य समाजामध्ये आदर्शवत व कौतुकास्पद आहे.सिस्टर बिंदु व सिस्टर जोसी यांनी स्वतःची पर्वा न करता कोरोना काळात गरजवंतापर्यंत गरजेच्या वस्तू पोहोच करून त्यांना धीर देण्याचे काम केले आहे हे असतांना त्यांनी महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून करत असलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असल्याचे सांगून ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सामाजिक ताकद उभा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

याप्रसंगी ख्रिस्ती विकास परिषदेच्या राज्य कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून राजेंद्र वाघमारे यांना अनिल भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.तर दीपक कदम यांनी नेवासा तालुकाध्यक्षपदी कमलेश गायकवाड यांची नियुक्ती जाहीर केली.
फादर दिलीप जाधव व फादर जॉन गुलदेकर यांनी परिषदेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लोंढे यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे यांनी सर्वांचे आभार मानले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी नेवासा येथील राजे शिवछत्रपती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश लव्हाटे,धर्मग्रामचे सेवेकरी आशाताई चक्रनारायण, रविंद्र पवार,डॉ.संजय कांबळे, पप्पू कांबळे,प्रशांत बोर्डे,अँड. राजेंद्र पंडित,सचिन धोंगडे, किशोर बोर्डे यांच्यासह नेवासा तालुक्यातील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!