Wednesday, October 27, 2021

पेट्रोलनंतर डिझेलचंही शंभरीपार या महाराष्ट्रात किंमतींने ओलांडला 100 री

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात पेट्रोलच्या किंमतीं नवनवे विक्रम प्रस्थापित करत असताना डिझेलनंदेखील आपलं शतक पूर्ण केलं आहे. देशातील एका राज्यामध्ये डिझेलच्या किंमतींनी 100 चा टप्पा पार केला असून इतर राज्यांमध्ये ते शंभरीच्या जवळ आहे. सर्वसामान्यांचं बजेट यामुळे पुरतं कोलमडून पडलं आहे.

राजस्थानमध्ये सध्या देशातील सर्वात महाग डिझेल मिळत असून एक लिटर डिझेलसाठी 100.10 रुपये मोजावे लागत आहेत. जयपूरमध्ये सोमवारी डिझेलच्या दरात नवा विक्रम नोंदवण्यात आला असून ते शंभरीच्य वर पोहोचलं आहे. राजस्थान पेट्रोलिअम

असोशिएशननं दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील डिझेलचे दर शंभरच्या पार पोहोचले आहेत. तर राजस्थानच्या सीमावर्ती भागातील दर हे जयपूरच्या तुलनेत अधिक आहेत. याचाच अर्थ राजस्थानच्या इतर भागातदेखील डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे.

देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरच्या पार पोहोचल्या असून डिझेलच्या किंमती नव्वदीत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.39 रुपये तर डिझेलचा दर 90.77 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 108.43 रुपये तर डिझेलच्या एका लिटरसाठी 98.48 रुपये मोजावे लागत आहेत.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!