Sunday, October 17, 2021

महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पुन्हा एकदा जोरावर पावसांचा अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे सोमवारी हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले.ओमानकडे गेलेल्या ‘शाहीन’ चक्रीवादळाची तीव्रता भारतात सध्या कमी होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.

तसेच नैऋत्य बंगालचे उपसागर व तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ व तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.मध्यम सरींची पुण्यात शक्यतापुणे शहर परिसरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत ऊन आणि सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक

ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच नागरिकांची तारांबळही उडाली. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!