Wednesday, October 27, 2021

साई मंदिर उघडण्यासाठी 24 तास शिल्लक :हे आहे नियम तर दररोज इतक्या भक्तांना दर्शन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :शिर्डीतील जगविख्यात साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानच्यावतीने साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन

पासची व्यवस्था भाविकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी शहरातील आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या

मंदिराच्या इतिहासात प्रथमच साई मंदिर बंद करण्यात आले होते. गेल्या 19 ते 20 महिन्यांच्या कालावधीत साई मंदिर दोन वेळा बंद झाले. यामध्ये शहरातील अनेक छोट्या मोठ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता मंदिर उघडण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले असतांना साईमंदीर

खुले होण्याकडे शिर्डी ग्रामस्थांची आस लागून राहिली आहे. तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार यशस्वी ठरले असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे.

शिर्डी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. शिर्डीकरांना आनंद झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एका दिवसाला 15 हजार पासेससची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये 5 हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, 5 हजार ऑफलाइन

पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने असे नियोजन करून दोन भाविकांमध्ये अंतर सहा फुटावर असे मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली आहे. मंदिरात मूर्तीच्या गाभार्‍यात हात न लावता मूर्ती दर्शन घ्यावयाचे असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी श्री. ठाकरे यांनी दिली आहे.

असे असले तरी शासनाच्यावतीने कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असा आदेश सरकारने पारीत केला नसल्याने मंदिर प्रशासनासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोविडच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दोन डोस लसीकरण पुर्ण करण्यासाठी शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून

माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने लसीकरण सप्ताह मोहीम राबविण्यात आली आहे. शहरात जवळपास लसीकरण पूर्ण होत आहे. शिर्डी शहरातील व्यवसायिकांनी देखील लसीकरण करून घेतले असून शासनाच्या नियमावलीनुसार अटीशर्तीचे पालन करण्यासाठी सज्ज झाले आहे.

प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा साईसंस्थानचे विश्वस्त शिवाजी गोंदकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!