Friday, October 22, 2021

एका बड्या घराण्यातील बाप लेकाकडून विवाहीत महिलेवर सलग 9 वर्षे बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील 35 वर्षीय महिलेवर पारनेर तालुक्यातील एका बड्या घराण्यातील बाप लेकांनी सलग नऊ वर्षे जोर जबरदस्ती करत तसेच वेगवेगळे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

राहुरी शहर हद्दीत राहणारी एक 35 वर्षीय विवाहित महिला सन 2010 पासून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील संतोष भंडारी यांच्याकडे मोल मजुरीचे काम करण्यासाठी गेली होती. सदर महिला 2010 पासून ते 2019 पर्यंत भंडारी यांच्या घरी घरकाम करत होती. तर तिचा पती भंडारी यांच्या किराणा

दुकानात मजुरीचे काम करत होता. सदर पती पत्नी त्यांच्या एका खोलीत राहत होते. काही दिवसांनी संतोष शांतिलाल भंडारी याने सदर महिलेला विविध प्रकारचे आश्वासन देऊन तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध केले.हे सर्व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी याला समजले.

तो सदर महिलेला म्हणाला, तुझे व माझ्या वडिलांचे शारिरीक संबंध आहेत. माझ्याशीपण शारिरीक संबंध ठेव. नाहीतर हे सर्व मी सगळ्यांना सांगेन. अशी धमकी देऊन त्यानेही सदर महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. संतोष भंडारी व राजेश भंडारी या बाप-लेकाकडून वारंवार होणार्‍या अत्याचाराला

कंटाळून हा सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगणार आहे. असे सदर महिलेने त्यांना सांगितले. त्यावर त्या बाप -लेकांनी तू जर आमचे नाव कोठे घेतले किंवा कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर व तुझ्या पतीवर चोरी आणि इतर खोटे गुन्हे दाखल करून अडकवून टाकू, अशी धमकी दिली आणि तिच्यावरील अत्याचार चालूच ठेवले.

बाप-लेकाच्या अत्याचाराला कंटाळून सदर महिला व तिचा पती टाकळी ढोकेश्वर सोडून राहुरीत आले. दरम्यान सदर महिलेने 15 मार्च 2021 रोजी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान संतोष भंडारी व राजेश भंडारी आणि नगर येथील एका राजकीय पुढार्‍याने सदर महिलेला समक्ष बोलावून तू तक्रार मागे घे. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला गायब करून मारून टाकू, अशी धमकी देऊन तिच्या पतीला मारहाण केली. सदर महिलेने राहुरी पोलिसांत धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून

संतोष शांतिलाल भंडारी व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी दोघे राहणार टाकळीढोकेश्वर, तालुका पारनेर या बाप-लेका विरोधात वारंवार बलात्कार करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करून गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले करीत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!