Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या गावात ढग फुटी सदृश पाऊस, ओढेनाले तुडूंब

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यातील काही ठिकाणी ढग फुटी सदृश पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील मल्हारवाडी, बारागाव नांदूरसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे.

हावरीच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नांदूरचा राहुरीशी संपर्क तुटला आहे.टाकळीमिया परिसरात ६७ मी.मी पावसाची नोंद झाली असून ओढे-नाले फुल्ल होऊन शेतात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकरी

हवालदिल झाला आहे.तसेच या ढग फुटी सदृश पावसाने चिंचविहीरे परिसरात ओढेनाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे

अतिृष्टीमुळे परिसरात जास्त पाण्याचे प्रवाहने शेतीसह गावात देखील पाणीच पाणी झाले आहे. गावात आलेल्या पाण्याच्या प्रवाहाना काही अडचण येऊ नये म्हणून गावचे सरपंच मंगेश गाडे ,उपसपंच प्रतिनिधी किशोर जाधव सर्व सदस्य सहकारी तसेच सुधिर गावडे, अमोल गाडे, रमेश गावडे, बाबासाहेब जाधव, रामभाऊ गाडे,

संदीप गाडे, अमोल जाधव, शुभम सरोदे, अजित साबळे, दादा जाधव, विकास गावडे, दादा कोठुले, कौस्तुभ गोसावी, दादा सागर, प्रविण जाधव, गणेश येवले, भैय्या गाडे, सचिन गाडे, भोरू डोंगरे, संतोष पवार यांच्यासह गावातील युवक मदत कार्य करत आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!