Saturday, October 23, 2021

साईमंदीरात दर्शनासाठी जाता ही बातमी वाचा मगच प्रवेश;नियामलीत पुन्हा बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कोवीड परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता मंदिर प्रशासन व शासकीय विभागाने घ्यावी. तसेच शिर्डी श्री.साईबाबा मंदिरात

ऑनलाईन पास असलेल्या भक्तांनाच प्रवेश दिला जाईल. दररोज 15 हजार भक्तांना प्रवेश दिला जाईल. प्रसादालय बंद ठेवण्यात येईल. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.दि.७ ऑक्टोंबर पासून धार्मिकस्थळे भक्तांसाठी

सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री.साईबाबा संस्थानच्या सभागृहात आज संपन्न झाली. डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी श्री.भोसले बोलत होते.

श्री.भोसले म्हणाले, शासनाच्या 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करतांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने

अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरिराचे तापमान तपासले जाईल. कोवीड-19 ची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये 10 वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्तीत

तसेच मास्क न वापरणा-या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने रात्री साडेआठ वाजेनंतर बंद करण्यात याव्यात.

मंदिरात प्रवेश देतांना कोवीड लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये. पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही. मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा. असे आवाहन श्री.भोसले यांनी यावेळी केले.

बैठकीत शिर्डी , शनिशिंगणापूर, मोहटे व राशिन देवस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यांशी मंदिर नियमावली बाबत चर्चा केली. मंदिर प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या हमीपत्रांवरील बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्हयातील कोवीड परिस्थिती लक्षात घेता.

कोवीड मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरल्यानंतर सर्व विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्या

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...
error: Content is protected !!