Wednesday, October 27, 2021

गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या महिलांनी नवरात्रीत उपवास करताना ही काळजी घ्या अन्यथा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरूवात होतेय. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गा मातेच्या व विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीतीली प्रत्येक दिवस हा देवीच्या नऊ रूपांपैकी एका रूपाला समर्पित केलेला असतो.

नऊ देवीच्या रूपांना नऊ दिवस भोग चढवला जातो. असं म्हणतात की या वेळी माता दुर्गासाठी जो प्रसाद बनवला जाते त्याने ती खुश होते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी ९ दिवसांचे व्रत केले जाते. मात्र अनेकदा काही

महिला व्रत करताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात मात्र असे करू नये. नवरात्रीदरम्यान गर्भवती महिलांनी उपवास  करताना काही गोष्टींचे ध्यान राखले पाहिजे.काही महिला दीर्घकाळ उपवास करतात मात्र यामुळे शरीरात अशक्तपणा, रक्ताची कमतरता, चक्कर यासारख्या समस्या निर्माण होतात.

उपवास करताना केवळ ठोस आहार घेऊ नका तर द्रव्य पदार्थाचेही सेवन करा. ताक, फ्रेश ज्यूस, दूध तसेच भरपूर पाणी प्या गर्भवती आणि बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी नवरात्रीच्या उपवासादरम्यान बटाटा, खीर, साबुदाणा, भजी असे जेवण करून नये. या गोष्टी वजन वाढवण्यास मदत करतात.

तसेच असे खाल्ल्याने पोटाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. काही महिला हा उपवास करताना मीठ खात नाही ज्यामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी निर्माण होते. सोबतच  ब्लड प्रेशरचीही समस्या निर्माण होते. असे करू नका. प्रेग्नंट महिलांनी निर्जळी उपवास करू नका. उपवासात सतत पाणी पित राहा

उपवासाबाबत स्वत:च विचार करू नका. याबाबत डॉक्टरांना जरूर विचारा. जर उपवास केल्याने तुम्हाला आणि  तुमच्या बाळाला त्रास होणार नसेल तरच उपवास करा. कोणत्याही स्थितीत आपल्या शरीराला त्रास होई असे काही करू नका. जेव्हा तुम्ही प्रेग्नंट

असता तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जास्त एनर्जीची गरज असते. या दरम्यान ताजी फळे आणि असे पदार्थ खात राहा ज्यामुळे तुम्हाला एनर्जी येईल

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!