Friday, March 24, 2023

सर्वात मोठी बातमी ! राज्यपालांनी बहुमत चाचणी घेणं सरकार पाडण्यासाठीचं पाऊल; सरन्यायाधीशांचे कडक शब्दात ताशेरे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

त्यानंतर आज राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी जोरदार बॅटिंग केली. तुषार मेहता यांनी राज्यपालांचे अधिकार आणि त्यांनी घेतलेले निर्णय कसे योग्य होते, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र, सरन्यायाधीश

डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. अत्यंत कडक शब्दात चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. त्यांचं हे कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं

पाऊल होतं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या निर्णयावर व्यक्तिगतही

नाराजी दर्शवली आहे. आमदारांनी जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं योग्य नव्हतं. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं.

सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं, असं महत्त्वाचं विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.यावेळी राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. सरकार नेहमी बहुमतात असावं लागतं.

आमदारांच्या पत्रावरून सरकार बहुमतात नव्हतं हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच राज्यपालांना बहुमत चाचणी घ्यावी लागली, असं तुषार मेहता यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!