Wednesday, October 27, 2021

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगरचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय.

हा आरोप किरीट सोमय्या नाही तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मदत केल्याचा आरोपही कदम यांनी केला.

मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्कमधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला आहे. मुश्रीफ आणि पाटील यांनी राजकीय पदाचा गैरवावर करुन

अधिकाऱ्यांवर दबाव आणत ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावानं केली. त्यानंतर या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभा केलाय. याच परिसरात अजून 33 गुंठे जमीनही आपल्याच नावावर करण्याचा साजिद मुश्रीफ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कदम यांनी केला.

मुश्रीफ यांनी बळकावलेल्या जागांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यातील या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सुनील कदम यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासह आता सतेज पाटीलही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्या जावयाच्या कंपनीला कंत्राट दिलं, असा आरोप सोमय्यांनी केला. हा घोटाळा 1500 कोटी रुपयांचा आरोप किरीट सोमय्या

यांनी केला आहे. जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. ठाकरे सरकारच्या मंत्र्यामध्ये घोटाळा करण्याची कला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!