Wednesday, October 27, 2021

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान म्हणाले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात हळूहळू सर्व व्यवहार खुले होत असले तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सातत्यानं व्यक्त केली जात आहे. त्यामुळं सर्वसामान्यांमध्येही एक प्रकारचा संभ्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित ‘राज्याचा अर्थसंकल्प: माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. ‘आजवर शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं.

करोनाची साथ आणि नैसर्गिक संकट आल्यानंतर सर्वांची दाणादाण उडाली. अशा स्थितीतही जगात कुठेही नसतील इतक्या वेगानं नि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या. लोकांचे जीव वाचवण्यास आपलं प्राधान्य असल्यामुळं मागील दोन वर्षात आरोग्य क्षेत्राला अधिक निधी दिला,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

करोनाची तिसरी लाट ओसरलीय असं म्हटलं जातंय, तसा थोडा अनुभवही येतोय. तिसरी लाट येऊ नये ही प्रार्थना आहेच, पण त्याला प्रयत्नांची साथ हवी आहे. पण तिसरी लाट आलीच तर काय करायचं? त्यासाठी आज उभ्या करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज आहे. त्या सुविधा

योग्य प्रकारे चालू राहतील हे पाहणं महत्त्वाचं आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.एकापाठोपाठ एक संकट येताहेत. आता आलेलं गुलाब वादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकणार नाही असं म्हणत असताना राज्याला या गुलाबाचे काटे टोचले आणि अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान झाल. त्यातूही मार्ग काढत आपण पुढं जात आहोत.

आपत्तीत सर्वस्व हरवलेल्याना धीर देण्याचं काम करावं लागतं. हे करताना खोटी आश्वासनं देता कामा नये. मी स्वत: हे करतो, भलेही माझ्यावर टीका होत असेल, मला त्याची पर्वा नाही,’ असंही उद्धव ठाकरे यांनी.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!