Saturday, October 23, 2021

नगर ब्रेकींग:धक्कादायक:या गावातील पती – पत्नी नदीत गेले वाहून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील शहरातील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले गणपती घाट परिसरात मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. पैकी दोघेजण सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज (मंगळवारी)

दुपारी एक वाजता घडली. त्यांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. तिघेजण बालंबाल बचावले. अमर चंद्रकांत पगारे (वय १५) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे बंधाऱ्यात मासेमारीसाठी गेलेले आदिवासी कुटूंबातील पती-पत्नी वाहून गेले. चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय ३५), मंजाबापू भागवत गायकवाड (वय ४०) असे त्यांची नावे आहेत. आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दरम्यान, ग्रामस्थांसह तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, बंधाऱ्यातील वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने दोघेही पाण्या सोबत वाहून गेले. काही वेळानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने चंद्रकला याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

तर मंजाबापू यांच्यासाठी सायंकाळी उशिरा पर्यंत शोधकार्य सुरु होते. पोलिसांनी पंचनामा करुन एक मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी येथील रुग्णालयात पाठविला होता. गायकवाड हे पत्नी समवेत बंधाऱ्याच्या भिंतीवर आज दुपारी मासेमारीसाठी गेले होते. बंधाऱ्याच्या भितीवर मासे पकडताना तोल जाऊन ते पाण्यात पडले.

त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नी चंद्रकलासह दोघेही वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मात्र, वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने वाचविण्यात अपयश आले. पोलिस निरीक्षक साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी पहाणी करुन माहिती घेतली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!