Monday, October 18, 2021

स्विमिंग पुलमध्ये रंगेलपणा करणार्‍या डीएसपीसह महिला कॉन्‍स्‍टेबल बडतर्फ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्विमिंग पुलमध्ये सहा वर्षांच्‍या बालकासमोर खुल्लम खुल्ला रंगेलपणा करणार्‍या राजस्‍थानमधील डीएसपी हीरलाल सैनीसह महिला कॉन्‍स्‍टेबलला अखेर बडतर्फ करण्‍यात आले आहे. मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या आदेशानुसार ही कारवाई करण्‍यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 अजमेर जिल्ह्यातील बेवार येथे डीएसपी हीरालाल सैनी कार्यरत होता. अजमेर येथील पुष्‍करमधील एका रिसार्टमधील जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळी येथे महिला कॉन्स्टेबलचा सहा वर्षांचा मुलगा देखील होता.

हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने राजस्‍थान पोलिस दलात खळबळ माजली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलचा पतीने तक्रार दाखल केली. डीएसपी हीरालाल सैनी याला ९ सप्‍टेंबर तर महिला कॉन्‍स्‍टेबलला १२ सप्‍टेंबरला अटक करण्‍यात आले हाेते.

महिला कॉन्स्टेबलने १३ जुलै २०२१ रोजी जलतरण तलावातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवले होते. यात महिलेचे ६ वर्षाचा मुलगाही हाेता. नंतर काही वेळात २ मिनिट ३८ सेकंदाचा दुसरा व्हिडिओ समोर आला हाेता. डीएसपी हीरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबलसह तिचा ६ वर्षाचा मुलगाही हाेता.

या प्रकरणाची राज्य बाल संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली हाेती. आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी नागौर पोलिस अधीक्षकांकडे तीन दिवसांत अहवाल मागितला होता.सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी ८ सप्टेंबर रोजी हिरालाल सैनी याला

निलंबित केले होते. डीएसपी आणि महिला कॉन्‍स्‍टेबलविरोधात विभागीय चौकशी झाली. याचा अहवाल मुख्‍यमंत्री कार्यालयास सादर करण्‍यात आला. यानंतर डीएसपी हीरलाल सैनीसह महिला कॉन्‍स्‍टेबलला बडतर्फ करण्‍याचा आदेश मुख्‍यमंत्री कार्यालयाने दिला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!