Monday, October 25, 2021

नगरच्या महापौरांनी राजीनामा द्यावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगरमधील रस्त्यांवरील खड्डे हा एक मोठाच त्रासदायक विषय आहे. तथापि, या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी शिवसैनिकच आंदोलन करत असतील तर हे हास्यास्पद आहे. त्याची तातडीने दखल घेऊन शिवसेना नेत्या, महापौर रोहिणी शेंडगे

यांनीच राजीनामा द्यायला हवा, अशी खिल्ली मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी उडविली आहे.शहारातील खराब रस्त्यांवर आता पायी चालणे सुद्धा अत्यंत धोक्‍याचे झालेले आहे. मात्र, ज्यांच्यावर नगरकरांनी आता शहराची जबाबदारी दिली, असे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक तसेच

पदाधिकारी खड्डे बुजविण्याबाबत आयुक्तांना घेराव घालत आहेत. आयुक्तांना आंदोलनाचा इशारा देत आहेत, महापालिकेच्या इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देत आहेत. “न भूतो न भविष्यती’ असे आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. हे कुठेतरी शिवसेनेतील अंतर्गत वादातून होत आहे.

अशाप्रकारे सत्ताधारी म्हणून शिवसेनेने काम न करता अंतर्गत गटबाजीमुळे एक गट सत्तेच्या विरोधात आंदोलन करणार असेल व एक गट फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल, तर येणाऱ्या काळात शहर विकासासाठी ही धोक्‍याची घंटाच आहे. नगरकरांनी सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले.

शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिल्यानंतर सत्ताधारी म्हणून नगरकरांनी शिवसेनेला स्वीकारल आणि सत्ताधारी स्वीकारल्यानंतर जर शिवसेनाच आंदोलनाचा इशारा देत असतील, तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना महापौर पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही.

नगर शहरासाठी सर्व नगरसेवक तसेच सत्ताधारी महापौरांना शहर विकासाचे नियोजन जमत नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी टीका भुतारे यांनी केली आहे.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी करावी. नगरविकामंत्री शिवसेनेचा असल्याने शहरातलील रस्त्यांना निधी आणता येईल.

मात्र, महापौरांना तो निधी आणता येत नसेल, तर या पदावर बसून काय उपयोग? असा सवाल भुतारे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!