Monday, October 18, 2021

पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून मान्सून परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूसच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.परतीच्या पाऊस हा राजस्थानपासून सुरू होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

पुढील चार-पाच दिवस राज्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असे वातावरण दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री निर्माण होईल. नागरिकांना खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंत होसाळीकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!