Friday, October 22, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत खळबळजनक आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणी NCB ने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. पण याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत खळबळजनक आरोप करत NCB च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, एकूण परिस्थिती पाहता ही संपूर्ण कारवाईच बनावट आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता NCB ने खुलासा करणं गरजेचं आहे.

राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत.

गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे हत्या प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, ड्रग्ससाठी त्याची हत्या झाली.

तेव्हापासून NCB चं झोनल ऑफिस लाइमलाइटमध्ये आलं. त्यानंतर त्या प्रकरणात बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि बॉलिवूडचं नाव खराब करण्यात आलं. अनेक कलाकारांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

3 ऑक्टोबरला आपल्यासमोर आलं की, भारतात नुकत्याच सुरु झालेल्या क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतलं. हे आपण सर्वांनी माझ्यासारखंच टीव्हीवर पाहिलं असेल. यावेळी ANI या वृत्तसंस्थेने काही व्हीडिओ रिलीज केले. ज्यामध्ये आपण पाहिलं

असेल की एक केस नसलेला माणूस आर्यनला NCB कार्यालयात खेचत घेऊन जात आहे.त्यानंतर याच व्यक्तीचा आर्यनसोबतचा फोटो व्हायरल झाला. पण NCB ने याविषयी स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की, हा NCB चा अधिकारी किंवा कर्मचारी नाही. मग हा व्यक्ती नेमका कोण? हा आमचा मोठा सवाल आहे.

जर हा अधिकारी नाही तर तो आर्यनला NCB कार्यालयात कसं काय घेऊन जात होता?आता याचा खुलासा आम्ही करणार आहे. जो व्यक्ती आर्यनला खेचून NCB कार्यालयात गेला त्याचं त्याचं नाव KP गोसावी आहे. तर एक दुसरा व्यक्ती जो अरबाज मर्चंट याला घेऊन जात होता. त्याचं नाव आहे मनिष भानुशाली.

हा मनिष भानुशाली देखील NCB चा अधिकारी नाही. तर तो भाजपचा उपाध्यक्ष आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!