Friday, October 22, 2021

बच्चु कडु मंत्रीपदाचा राजीनामा देणार ? चुलीत गेलं ते मंत्रिपद…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे युवा आमदार अमोल मिटकरी व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मिटकरी यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या निकाला उल्लेख करत पालकमंत्री बच्चू कडू हे भाजपच्या आमिषाला बळी पडले का?

असा प्रश्न केला असता राज्यमंत्री बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी ‘अमोल मिटकरी तुम्ही सिद्ध करून दाखवा. चुलीत गेलं ते मंत्रिपद, मी उद्या राजीनामा देऊन फेकतो’, असे थेट व्यक्तव्य करत मिटकरी यांना फटाकरले.

अकोला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वंचितने आपला गड राखला आहे. खुद्द अमोल मिटकरी यांच्या गावात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. हा पराभव मिटकरींच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वच पक्षांनी

पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आत्मचिंतन करावे. कुरघोडीचं राजकारण करू नये. महाविकास आघाडी एकत्र आली नाहीतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपयश येऊ शकतं, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. बच्चू कडू हे शेतकरी नेते आहे. त्यांनी शेतकरी विरोधी पक्ष

असलेल्या भाजपसोबत आतून गठबंधन केलं. मग ते महाविकास आघाडीचे मंत्री असताना त्यांनी असं का केलं? बच्चू कडू आणि आमच्यामध्ये समन्वय आहे की नाही हे सर्वांना माहिती आहे. पण, ते भाजपच्या आमिषाला बळी पडले का? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. ते टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होते.

दरम्यान, बच्चू कडू यांनी मिटकरींवर जोरदार प्रहार केला. ”मिटकरी हा मोठा माणूस आहे, मी त्याच्याबाबत बोलू शकत नाही. मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही. ही माझी संस्कृती नाही. असं काही असेल तर मिटकरींनी सिद्ध करावे. हवेत आरोप कोणीही करू शकतात. मिटकरी हे बरोबर नाही. हे मी सहन नाही करणार.

चुलीत गेलं ते मंत्रिपद. आमिषाला बळी पडणं म्हणजे काय असतं? ते मला आधी सांगा. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आहेत. मी कुठल्या आमिषाला बळी पडलो, ते सिद्ध करा. मी उद्या राजीनामा देऊन फेकतो. मला त्याची गरज नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!