Monday, October 25, 2021

पाडेगाव ऊस बेणे विक्रीचा शुभारंभ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

राहुरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभुत ऊस बेणे विक्रीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ऊसामध्ये एकरी 168 टन उत्पादन घेणारे श्री. संजीव माने व श्री. अशोक खोत या प्रगतशील शेतकर्यांच्या हस्ते बेणे वाटपाला सुरुवात झाली.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्री. विजयसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद सदस्य आमदार श्री. रणजिंतसिंह मोहिते पाटील यांनी पाडेगावच्या प्रक्षेत्रावरील ऊस बेणे मळयास भेट देऊन संशोधन उपलब्धीची माहिती घेतली. यावेळी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पाडेगाव संशोधन केंद्राने 15.35 हेक्टर क्षेत्रावर ऊसाच्या मुलभुत बेणे घेतले असुन या बेणेची लागवड डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत करण्यात आलेली आहे. यामध्ये को-86032 हे वाण 8.05 हेक्टर क्षेत्रावर तर फुले-265 3.90 हेक्टर, फुले-10001 2.30 हेक्टर आणि फुले 09057 1.10 हेक्टर बेणे क्षेत्राचा समावेश आहे. एकुण एक कोटी दोन डोळा टिपरी बेणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. हे बेणे 1000 एकरासाठी पुरणारे आहे. एक गुंठा लागवडीसाठी दोन डोळ्याची 250 टिपरी लागतात. त्याच्या माध्यमातुन पुढीलवर्षी 1250 ऊस तयार होतील व दोन डोळ्याची 25000 टिपरी उपलब्ध होईल. अशाप्रकारे एक गुंठे प्लॉटमधुन एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येईल. एक कोटी बेण्याच्या माध्यमातुन पुढीलवर्षी चार लाख हेक्टर क्षेत्रावर बेणे लावता येईल. बेणे ऊसाच्या दोन डोळ्याच्या एक हजार टिपरीचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रु. 1550/- असा आहे. या केंद्रातुन बेणे घेण्यासाठी बेणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे मो.नं. 8275473191 व डॉ. दत्तात्रय थोरवे मो.नं. 9881644573 यांचेशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत संपर्क साधावा. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांचे विकासाकरीता सतत प्रयत्नशील आहे. या संशोधन केंद्राने तयार केलेल्या को-86032, फुले-265, फुले-10001 आणि फुले -09057 या ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व शेतकर्यांनी नविन लागवडीसाठी उपयोग करावा असे आवाहन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!