Sunday, October 17, 2021

भेंड्यातील दोन घरांवर वीज कोसळली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील आबासाहेब तुपे व भेंडा खुर्द येथील इंजिनिअर दीपक नवले या दोघांचे घरावर वीज पडल्याची घटना दि.5 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेत सुदैवाने कुठली ही जिवीत नाही झालेली नाही.

भेंडा परिसरात दि.5 रोजी सायंकाळी वारा-ढगांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली.अवघ्या तासाभरात
70 मिमी पावसाची नोंद झाली. भेंडा येथे आज पर्यंत 680 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

भेंडा बुद्रुक येथील फिटर आबासाहेब तुपे यांच्या घराचे जिन्यासाठी छतावर बांधलेल्या टॉवरवर वीज पडून भिंती फोडून वीज आरपार झाली.यात भिंतीला भगदाड पडण्या व्यतिरिक्त कोणते ही नुकसान झाले नाही.

तर भेंडा खुर्द येथे इंजिनिअर दीपक नवले यांचे घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीसाठीलावलेल्या लोखंडी स्टँडला विज येऊन आदळली.त्यामुळे स्टॅण्ड खालील फरशी व स्लॅबचा थोडा भाग फुटला आहे. दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. मात्र विजेची वायरिंग जळून घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे खराब झाली आहेत. विज आदळल्याने झालेला प्रंचड आवाज व उजेड यामुळे तुपे व नवले कुटुंबातील सर्व सदस्य बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होते.

या सततच्या पावसाने खरीपातील कोणतेही पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची आशा उरलेली नाही.भेंडा परिसारातील सर्व विहिरी तुडुंब भरल्या असून सर्वच ओढे-नाले दुथडी भरून वाहात आहेत.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!