Monday, October 25, 2021

येणाऱ्या लोकसभेसाठी खा विखेंना तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी या दोन आमदारांचा गांभीर्याने विचार सुरु

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तहसीलदाराच्या ध्वनिफितीमुळे वादग्रस्त ठरलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके  यांच्या निवासस्थानी भेट देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना  ताकद दिल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

केंद्रीय रस्ते वाहतूक प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गडकरी आणि पवार एका व्यासपीठावर आले. या कार्यक्रमानंतर पवार यांनी पुण्याला जाताना पारनेरचे आमदार लंके यांच्या निवासस्थानी भेट दिली.दीड वर्षाने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघासाठी

राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला असल्याची चर्चा पवार यांनी आमदार लंके यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीच्या निमित्ताने सुरू झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार लंके व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या पर्यायांचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे मानले जाते.

विखे यांनी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढविली. त्यावेळी राष्ट्रवादीने नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि स्वत: पवार यांनीही प्रतिष्ठेची केली.यात मात्र राष्ट्रवादीचा पराभव झाला. आता याच जागेसाठी राष्ट्रवादी पुन्हा जोमाने तयारीला लागल्याचे सांगितले जाते.

मधल्या काळात शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांचा पराभव करून आमदार झालेले लंके राष्ट्रवादीसाठी नवी आशा निर्माण झाले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्याच नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!