Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील घटना :अशी वेळी कोणावर पण येऊ नये :दोघा सख्या मुलांना पाहून आईने फोडलेला हंबरडा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी  : शहरात काल (मंगळवारी) दुपारी गणपती घाटाजवळ मुळा नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह आज (बुधवारी) पाण्यावर तरंगताना आढळले. मृत सख्खे भाऊ होते. मृत मुलांना पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून गेला.

अमर चंद्रकांत पगारे (वय १५) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी मृतांची नावे आहेत. काल दुपारी एक वाजता लोहार गल्लीतील पाच मुले मुळा नदी पात्रात पोहोण्यासाठी गेले होते. पैकी, अमर व सुमित पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. इतर तिघेजण थोडक्यात बचावले.

काल दुपारपासून नदीपात्रात शोधकार्य सुरु होते. परंतु, रात्री अंधार होईपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे, शोधकार्य थांबविले होते. आज (बुधवारी) सकाळी सव्वासात वाजता गणपती घाट परिसरात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर अमरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

सकाळी अकरा वाजता सुमितचा मृतदेह तनपुरेवाडी रोड, व्यंकटेश नर्सरी परिसरात गाडेकर यांच्या शेती जमिनीलगत मुळा नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळला. देवा कर्डक, सुरेश वाघ, फुलसौंदर, आलम शेख व स्थानिक तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

राहुरी ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह ठेवण्यात आले. यावेळी मृत मुलांची आई, बहिण व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. तेंव्हा उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!