Wednesday, October 27, 2021

रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या विविध पदांची भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एसी मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्‍ट्रिशियन आणि इतर ट्रेडच्या एकूण 4103 रिक्त जागा विविध युनिटमध्ये भरल्या जाणार आहेत.

4 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर श्रेणीनिहाय रिक्त पदांचा तपशीलही अधिसूचनेमध्ये उपलब्ध आहे.रेल्वेमधील अप्रेंटिस पदांसाठी हे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

याव्यतिरिक्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 4 ऑक्‍टोबर 2021 नुसार वयाची गणना केली जाईल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पात्रता निकषांवरील

तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात. अशी होईल निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

येथे करा ऑनलाईन अर्ज उमेदवार scr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध अप्रेंटिस प्रशिक्षण 2021 च्या ऑनलाइन अर्ज लिंकद्वारे अर्ज करू शकतात.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!