Monday, October 25, 2021

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्राची नवी ‘गाईडलाईन्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू ओसरू लागला आहे. त्यामुळे परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची

असून केंद्र सरकारने शाळांची जबाबदारी निश्चित केली असून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास संबंधित शाळांना दंड होऊ शकतो. शाळांची मान्यताही रद्द केली जाऊ शकते.

नियम काटेकोरपणे पालन करा…शाळांना सुरक्षित पायाभूत सुविधा पुरवणे, वेळेवर वैद्यकीय मदत पुरवणे, विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे, तसेच शिक्षकांकडून धमकी, शारीरिक शिक्षा, भेदभाव आणि मादक पदार्थांचा गैरवापर रोखणे आणि COVID -19 चा प्रसार रोखणे असे म्हटले गेले आहे.

याचे काटेकोरपणे पाळले पाहिजे. असे या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.नव्या मार्गदर्शकतत्त्वामध्ये असे म्हटले आहे की, शाळांमध्ये समरसतेचे वातावरण, शारीरिक, सामाजिक-भावनिक आणि मानसिक कल्याण सुरक्षित शालेय वातावरणासाठी आवश्यक आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व शाळांसाठी लागू केली जातील. मार्गदर्शक तत्त्वांबाबत निष्काळजीपणा केला शाळा प्रशासनाला जबाबदार धरले जाईल.-सुरक्षित पायाभूत सुविधेबाबत निष्काळजीपणा -कॅम्पसमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्न आणि पाण्याबाबत निष्काळजीपणा, -विद्यार्थ्यांना वैद्यकीय

 मदत पुरवण्यास विलंब, -विद्यार्थ्याने नोंदवलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात निष्काळजीपणा- मानसिक व भावनिक छळ, -गुंडगिरी रोखण्यात निष्काळजीपणा, -भेदभाव करणारी कारवाई, -शाळेच्या परिसरात मादक पदार्थांचा गैरवापर, -आपत्ती किंवा गुन्ह्याच्या वेळी निष्क्रियता – कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांच्या काटेकोर अंमलबजावणीत निष्काळजीपणा.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!