Saturday, September 23, 2023

देवगांव-शहापुर शिवारातील शेतात छापा टाकून गांजा-अफूची ६२४ झाडे जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालूक्यातील शहापुर व देवगांव शिवारामध्ये बेकायदेशीर गांजा व अफुचे शेतीवर छापा टाकून स्थकनिक गुन्हे शाखेच्या पथकाने य१४ लाख ९५ हजार ४२० रुपये किंमतीची ६२४ लहान-मोठी गांजा व अफुचीची झाडे जप्त केली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शहापूर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्याच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजा व अफूचे झाडांची लागवड केलेली आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाल्याने सांगितली‌.
श्री. ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथे जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री करुन, स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेऊन प्रथम शहापुर येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांच्या शेतात पाहाणी केली. यावेळी गव्हाचे शेतामध्ये २.५ फुट उंचीची दोन व घरासमोर ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरासमोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढून तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्याने छापा टाकला. या छाप्यात बाबुराव लक्ष्मण साळवे याच्या कब्जातील शेतामधून १ लाख ११ हजार ४२० रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.

तसेच देवगांव येथे जाऊन रावसाहेब भागुजी गिलगिले यांच्या शेताची पाहणी केली.या दरम्यान शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आल्या. छापा टाकून रावसाहेब भागुजी गिलबिले (वय ३८, रा. देवगांव, ता. नेवासा) याच्या कब्जातील शेतामधून १३ लाख ८४ हजार रु. किंमतीची ६८.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.

या प्रमाणे नेवासा तालुक्यातील शहापूर येथे कारवाई करुन १ लाख ११ हजार ४२० रु. किंमतीची ३ गांजाची लहान मोठी हिरवी झाडे व देवगांव येथे कारवाई करुन १३ लाख ८४ हजार रु. किंमतीची ६९.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे असा एकूण १४ लाख ९५ हजार ४२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. एलसीबीचे पोना‌ संदीप संजय दरदंले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०९/२०२३ एन. डी. पी. एस. कायदा कलम ८ (क), १५, १८, २० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर व पोलीस उपअधीक्षक डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि गणेश वारुळे, सफौ विष्णु घोडेचोर, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदीप दरदंले, पोकॉ शिवाजी ढाकणे,’ मपोना भाग्यश्री भिटे, मपोकॉ ज्योती शिंदे व चालक पोहेकॉ बबन बेरड यांनी ही
कारवाई केली आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!