Monday, October 25, 2021

या बँकेची जबरदस्त ऑफर, तुमचे सोने ठेवा सुरक्षित व कमवा जबरदस्त पैसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:SBI ने ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. SBI ने गोल्ड डिपॉझिट स्कीमला नव्या अवतारात लाँच केला आहे. ही गोल्ड फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये बँकेत सोने जमा करा. याबदल्यात तुम्हाला व्याज मिळणार आहे. यामध्ये तुमचं सोनं देखील सुरक्षित राहतं आणि तुमच्या पैसे देखील मिळतात.

योजनेसाठी पात्रता अशी आहे की भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या व्यतिरिक्त प्रॉपराइटर, एचयूएफ, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड असू शकतो जो सेबी, कंपन्या, धर्मादाय संस्था आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही

घटकाकडे नोंदणीकृत आहे. एसबीआयच्या या योजनेत किमान 10 ग्रॅम गुंतवावे लागतील. हे सोन्याचे बार, नाणी, दागिन्यांच्या स्वरूपात असू शकते. यामध्ये तुम्ही पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता.

एसबीआय रिवॅम्प्ड गोल्ड डिपॉझिट स्कीम (SBI R-GDS)मध्ये तीन पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. शॉर्ट टर्म डिपॉझिट 1-3 वर्षांकरता असणार आहे. मध्यम टर्म डिपॉझिट 5-7 वर्षांकरता असेल. तर अधिक काळाकरता टर्म डिपॉझिट 12-15 काळाकरता असणार आहे.

वेगवेगळ्या टर्मकरता व्याजदर वेगळा
मिळालेल्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास, अल्प मुदतीच्या ठेवींखाली, 1 वर्षासाठी 0.50 टक्के वार्षिक, 0.55 टक्के 1-2 वर्षांसाठी, 0.60 टक्के 2-3 वर्षांसाठी, 0.50 टक्के व्याज मिळते. मध्यम मुदतीच्या ठेवींसाठी दरवर्षी 2.25 टक्के आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी 2.50 टक्के व्याज दर आहे.

रोख रक्कमेत मिळणार रिटर्न
परतफेडीच्या पर्यायाबद्दल बोलताना, तुम्ही एकतर परिपक्वतावर सोने घेऊ शकता किंवा मूल्य रोख स्वरूपात घेतले जाऊ शकते. सोन्याच्या स्वरूपात परतावा घेण्यासाठी 0.20 टक्के प्रशासकीय शुल्क कापले जाते.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!