Monday, October 25, 2021

काळजी घ्या:देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात

आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 22 हजार 431 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 318 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 24 हजार 602 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 38 लाख 94 हजार 312 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 49 हजार 856 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 44 हजार 198 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 92 कोटी 63 लाख 68 हजार 608 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.देशात कालच्या दिवसात आढळलेल्या 22 हजार 431 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एकट्या केरळामध्ये 12 हजार 616 रुग्ण सापडले आहेत. तर 318 कोरोनाबळींपैकी केरळमधील 134 जणांचा समावेश आहे.

देशात 24 तासात नवे रुग्ण – 22,431

देशात 24 तासात डिस्चार्ज – 24,602

देशात 24 तासात मृत्यू – 318

एकूण रूग्ण – 3,38,94,312

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,44,198

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,32,00,258

एकूण मृत्यू – 4,49,856

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 92,63,68,608

गेल्या 24 तासातील लसीकरण – 43,09,52

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!