Friday, October 22, 2021

पेट्रोलच्या दराने मोडले सर्व उच्चांक; जाणून घ्या आजचे दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांपुढे संकट निर्माण झालं आहे. लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरवढीचा भडका उडाला आहे. गुरुवारी देशभरात पेट्रोल प्रतिलीटर 25 ते 30 पैशांनी तर डिझेल 35 ते 40 पैशांनी महागलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलच्या दर घसरले होते.

मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही राज्यात पेट्रोलने शंभरीपार केली आहे. 24 सप्टेंबरपासून देशात प्रतिलीटर डिझेल 3 रुपयांनी तर पेट्रोल दोन रुपयांनी वाढलं आहे.जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 22 सप्टेंबरला क्रूड

ऑईलची किंमत प्रतिबॅलर 70.70 डॉलर होती. परंतु, आता ती किंमत 74.99 डॉलरवर पोहचली आहे. इंधनाची मागणी वाढल्याने काही दिवसांत क्रूड ऑईलची किंमत 80 डॉलरवर जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर अंदाजित दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये

 एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात.

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाख या राज्यात पेट्रोलचे दर प्रति लीटर 100 रुपयांच्या पुढे गेलं आहे.प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दरराजधानी दिल्ली :पेट्रोल – 103.24 रुपये प्रति लीटरडिझेल – 91.77 रुपये प्रति लीटरमुंबई :पेट्रोल – 109.25 रुपये प्रति लीटरडिझेल – 99.55 रुपये प्रति लीटर

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!