Monday, October 25, 2021

Jio च्या या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, मोफत मिळणार अनलिमिटेड इंटरनेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:Reliance Jio ने ग्राहकांना खूश करण्यासाठी आता दोन दिवसांचा अनलिमिटेड डेटा पॅक देण्याची घोषणा केली आहे.बुधवारी सकाळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील जिओ ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेटवर्क मिळत नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर कंपनीनं एक निवेदन जारी केलं.

काही ठिकाणी नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच कंपनीच्या टीमनं काही तासांतच या समस्येचं निराकरण केलं आहे. सध्या जिओच्या सर्व सेवा पूर्णपणे कार्यरत असल्याची माहिती या निवेदनात दिली आहे. यशिवाय झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीनं दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांना

खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभावित ग्राहकांना दोन दिवसांचा अतिरिक्त अनलिमिटेड डेटा पॅक देण्याची घोषणा या निवेदनातून करण्यात आली आहे.माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार देशभरातून आउटेजच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, कंपनीच्या निवेदनात केवळ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

सर्कलमधील ग्राहकांनाच फटका बसल्याचं म्हटलं आहे. या आउटेजमागील कारणाचा अद्याप रिलायन्स जिओनं खुलासा केलेला नाही.दोन दिवसीय कॉम्प्लिमेंट्री अनलिमिटेड डेटा देण्यासाठी कंपनी आउटेजनं प्रभावित झालेल्या ग्राहकांना एक SMS पाठवणार आहे. त्यानंतर दोन दिवसांचा डेटा त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे.

सध्याचा अॅक्टिव प्लॅन संपल्यानंतर हा दोन दिवसांचा प्लॅन अॅक्टिव होईल. जर तुमच्याकडे सध्या एका महिन्याचा डेटा प्लॅन असेल तर तो संपल्यानंतर तुम्हाला आणखी दोन दिवस अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळेल. म्हणजेच एकूण 32 दिवसांची सेवा ग्राहकांना मिळेलं, असं रिलायन्स जिओ कंपनीनं सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!