Saturday, October 23, 2021

नगर ब्रेकिंग:पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले.मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता

 श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला.या घटनेत उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले.गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजेच्या नानोर यांच्या घरात प्रवेश केला.

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना दाबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते.नानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. उपअधीक्षक मिटके हे दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते.

अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिवाल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्या जवळून गेली. मिटके हे थोडक्यात बचावले.जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आरोपीला अटक करण्यात आली आहे.दरम्यान आरोपी यांनी दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने खंडणी मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य आरोपीने केल्याचे समजले आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!