Monday, October 18, 2021

उद्योगभारती चा पाचवा सिक्कीम सेंद्रिय शेती कृषि अभ्यास दौरा जानेवारी २०२२ मधे जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या सुपरिचित उद्योजकता प्रशिक्षण विभाग तर्फे जानेवारी २०२२ मध्ये सिक्कीम राज्याच्या सेंद्रिय शेतीच्या कृषि अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इस्राईल कृषि अभ्यास दौर्यां सह इतर देशांचे तांत्रिक कृषि अभ्यास दौरे यशस्वी रित्या

आयोजित करणारी संस्था म्हणून उद्योगभारतीने राज्यात अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. सिक्कीम सेंद्रिय शेती कृषि अभ्यास दौरा ची ही उद्योगभारती ची पाचवी बॅच आहे. महाराष्ट्रातील शेतकरी रासायनिक शेतीला उत्तम पर्याय म्हणून बहुसंख्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत,

पण सेंद्रिय शेती बाबत योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांना लाभत नाही त्या मुळे सेंद्रिय शेती करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत त्या मुळेच हि उणीव भरून काढण्या करता या पुढे सातत्याने असे उपक्रम संस्थे कडून आयोजित केले जात असल्याची माहिती उद्योगभारती चे संचालक श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी दिली.

दिनांक १ ऑक्टोबर पासून दौऱ्याची नोंदणी सुरु झाली असून, १ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच हे प्रवेश सुरु राहतील. प्रवेश करता वयाची आणि शिक्षणाची अट नाही. पासपोर्ट ची अथवा कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अनेक युवा शेतकरी व सेंद्रिय शेतीच्या चळवळीतील कार्य

करणाऱ्यांच्या मागणी नुसार हा दौरा आयोजित केल्याची माहिती कार्यक्रमाचे समन्वयक श्री. प्रतिक बोंगाडे यांनी दिली आहे. दौऱ्याच्या खास बाबी वर बोलताना ते म्हणाले कि,या दौऱ्यात सेंद्रिय आले लागवड, फळबागेचे व्यवस्थापन,बेबी कॉर्न सारखी पिके,

सिक्कीम राज्याचा सेंद्रिय शेती धोरणाचा अभ्यास, सिक्कीम मधील शेतकरी व उद्योजकांसमवेत प्रत्यक्ष भेटी चर्चासत्रे, शिवार फेरी, बिझनेस नेटवर्किंग, तसेच सिक्कीम च अद्भुत निसर्ग सौंदर्य पाहणे, याक सफारी, चायना बॉर्डर भेट*,सिक्कीम ची संस्कृती पाहण्याची संधी अभ्यासकांना प्रशिक्षणार्थ्यांना यात मिळणार आहे.

हेलिकॉप्टर राईड देखील शेतकर्यांना आम्ही घडवली आहे असे श्री प्रतीक म्हणाले. मुंबई ते बागडोगरा विमान प्रवासाचा आनंद शेतकऱ्यांना सिक्कीम अभ्यास दौऱ्यात लुटता येईल. गंगटोक मधील सेंद्रिय आल्याची लागवड, भाजीपाला, इतर काही स्थानिक पिके, बेबी कॉर्न, त्यावर प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या, इत्यादी गंगटोक मधील समाविष्ट बाबी असतील. याच बरोबर पश्चिम पेंडम, र्हेनॉक, रांगपो, हा प्रदेश पाहणे व तेथील कृषि अभ्यास समाविष्ट आहे.

३७८० मीटर्स उंचीवर वसलेले आणि ५० फूट खोल प्रसिद्ध त्सांगो तळे व बाबा रॅम मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने दौऱ्यात समाविष्ट आहे.

रावांगला परिसरातील चहाचे मळे, विलायची, स्थानिक पिकांचा अभ्यास प्रशिक्षणार्थ्यांना करता येईल. पेलिंग, यूसोन्ग, बोरॉन पोलॉक इथे ग्राम अभ्यास प्रस्तावित आहे. मंगलाबारी इत्यादी प्रदेशांचा सेंद्रीय शेतीचा अभ्यास प्रस्तावित आहे.

परतीचा प्रवास सुद्धा विमानानेच केला जाणार आहे. या दौऱ्यात नाश्ता, जेवण, चहा, या बाबींचा वेगळा अथवा कोणताही छुपा खर्च नसेल. प्रवेश फी मध्ये सर्व बाबी समाविष्ट असून, द्वि तारांकित निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था असेल. सादर प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थ्याला दिले जाईल.

सेंद्रिय शेतीचा विस्तार आता वेगाने होत असून, सेंद्रिय उत्पादन बाबत जागरूकता कमालीची वाढलेली आहे. या अनुषंगाने दौऱ्यात अतिशय चांगला प्रतिसाद असून मुंबई,कोकण,पुणे,नाशिक,सातारा या भागातून युवक शेतकरी,उद्योजकांनी प्रवेश नोंदणी केली आहे असे समन्वयक प्रतिक यांनी सांगितले. दौऱ्यात मार्गदर्शक समन्वयक प्रत्येक ठिकाणी उपलब्ध

 असून या दौऱ्यास कोणते हि शासकीय अनुदान नाही. संपूर्ण सात दिवसांचा हा अभ्यास दौऱ्यात सेंद्रिय शेतीचे ज्ञान व पर्यटना चा आनंद मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्काचे आवाहन आयोजकांनी केले आहे. महिला कुटुंब यात सहभागी होऊ शकतात तसेच विविध कंपन्या चे डिलर देखील यात कंपनी स्पॉन्सर गटा द्वारे सहभागी होण्यासाठी आवाहन प्रतिक बोंगाडे यांनी केले आहे.

संपर्क – 7030713713 , 7620243437

इ मेल – agrigraduatesassociation@gmail.com

वेबसाईट – www.agriandgraduates.org

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!