Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक व नागरिकांमध्ये खळबळ हे आहे कारण..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना यावर केंद्रीय आयकर विभागाने छापा टाकला आहे. यामुळे तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणारे साखर कारखाने यावर केंद्रीय आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक परिसरामध्ये अजित पवार यांचा अंबालिका साखर कारखाना आहे, या कारखान्यावर देखील या पथकाने छापा टाकला आहे.

यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान हा छापा कशासाठी टाकण्यात आला याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जरंडेश्वर कारखाना भेटीनंतर अवघ्या चोवीस तासांत आयकर पथक जरंडेश्वर कारखान्यावर दाखल झाल्याने

 कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर छापेमारी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखाना भेटी दरम्यान किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंमत असेल तर कारखान्याचा खरा मालक जाहीर करावा असे ओपन चॅलेंज दिलं होतं.

त्यास २४ तास उलटले नाहीत तोच आयकर विभाग विभागाच्या चार गाड्या कारखान्यांवर तपासणीसाठी आल्याचे वृत्त तालुक्यात सर्वत्र पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तीन महिन्यांपूर्वी ईडीने महत्वपूर्ण निकाल दिला आणि कारखाना प्रशासनाला नोटीस बजावलेली होती.

दौंड साखर कारखान्यावरही चौकशीसाठी पथक
राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असताना गुरुवारी सकाळी 6 वाजलेपासून आलेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील दौंड शुगर या साखर कारखान्यावरतीही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!