Monday, October 25, 2021

आरोग्य मंत्री टोपेंचे नगर जिल्ह्यातील कोरोनाबाबत मोठं विधान म्हणाले..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आजपासून मंदिरे पुन्हा उघडण्यात आली आहेत. तर दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. राज्यात लसीकरण सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्याप टळलेला नाहीये.

त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असून जास्तीत जास्त वेळेत लसीकरण पूर्ण करणे गरजेचं आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत ‘मिशन कवच कुंडल’योजनेची घोषणा केली आहे.

टोपे म्हणाले, मिशन कवच कुंडल नावाने एक योजना आम्ही उद्यापासून करत आहोत. 8 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ही योजना राबवायची आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की, देशात 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्याच्या

दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट आहे. त्यानुसार ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मप आता तशी परिस्थिती नाहीये. आत्ता आपल्याकडे 75 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत.

25 लाख आणखी उपलब्ध होतील आणि अशाप्रकारे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहेत. त्यामुळे सहा दिवसांत हा स्टॉक पूर्ण संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला आम्ही दिलं आहे असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं.

दसरा, दिवाळी हिंदु धर्मातील मोठा सण आहे. त्यानंतर कोरोना वाढेल का याबाबत शंका व्यक्त केली जातेय. नगरमध्ये आम्ही विशेष लक्ष देत आहोत, लसीकरण वाढवतोय, चाचण्या वाढवाव्या असेही सांगितलं आहे. नगरमध्येही कोविडची स्थिती नियंत्रणात येईल असंही राजेश टोपेंनी म्हटलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!