Saturday, October 23, 2021

दसरा, दिवाळीनंतर महाराष्ट्रात तिसरी लाट ? आरोग्य मंत्री टोपेंनी दिला धोक्याचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला आहे त्यावेळी त्यांनी मोठं विधान केले आहे.राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

 दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं. मुस्लिम बांधवांनी बऱ्यापैकी लसीकरण केलं आहे.

मात्र मालेगाव सारख्या काही ठराविक ठिकाणी लसीकरण कमी झाल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी देखील धर्मगुरू, मौलवी, सामाजिक संस्था यांच सहकार्य घेऊन लसीकरण केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

उद्यापासून राज्यात मिशन कवच कुंडल सुरू करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे ‘मिशन कवच कुंडल’ सुरू राहणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट केंद्राने दिले आहे. त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही

याची काळजी आम्ही घेणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात दररोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या आपल्याकडे एक कोटी लसी उपलब्ध आहेत. तसेच यावेळी पहिल्या डोसला आपण प्राधान्य देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

मृत्यूदर रोखण्यात आपल्याला यश मिळणार आहे. त्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल मी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. या मोहिमेत शासना व्यतिरिक्त आम्ही एनजीओ, सामाजिक संस्था यांना देखील

 सहभागी करून घेणार आहोत. तसेच सेक्सवर्कर्ससाठी देखील विशेष मोहीम राबविली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!