Monday, October 18, 2021

खा विखे म्हणाले मी भाजपमध्ये येऊन खासदार झालो पण आईचे जि: प अध्यक्षपद वडिलांचे संभाव्य उपमुख्यमंत्रीपद हुकले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील कार्यक्रमात खासदार सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले जोडी आपल्या चिरपरिचित अंदाजात दिसली. एकमेकांना खिंडीत गाठत चिमटे घेण्याची संधी दोघांनीही सोडली नाही.

आपण मला भाजपात आणल्याने खासदार तर झालो, पण घरातील जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि संभाव्य उपमुख्यमंत्रीपद गेले. उद्या मी मंत्री होईपर्यंत तुम्ही भाजपात राहणार की नाही, असा थेट सवाल खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विचारल्यानंतर ‘तसा तर तुमचाही भरोसा नाही. मी गेलोच तर तुम्हाला घेऊन

जाईल’ या हजरजबाबी माजी आमदार शिवाजी कर्डिलेंच्या उत्तराने राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.याचवेळी खा.विखे यांनी ‘पण तोपर्यंत तुम्ही भाजपात राहणार ना?’ असा चिमटा काढला. त्यावर कर्डिले म्हणाले, ‘जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं. पण मला तुमचापण भरोसा वाटत नाही. त्यामुळे जाताना

तुम्हालाही सोबत घेऊन जाईल.’ त्यांच्या या उत्तराने कार्यक्रमाला जमलेले भाजप नेते आणि पदाधिकार्‍यांच्याही भुवया उंचावल्या. खा.विखेंनी आपल्या भाषणातून या विषयावर अधिक भाष्य केले. ते म्हणाले, मी जरी भाजपमध्ये येऊन खासदार झालो. मात्र त्यानंतर आईचे जिल्हा परिषद अध्यक्षपद गेले व वडिलांचे संभाव्य उपमुख्यमंत्रीपदही हुकले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात घुसलेल्या कार घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणारे मावळ येथे शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबाराची तुलना कशाशी करणार, असा सवाल खा.विखेंनी केला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!