Monday, October 25, 2021

धाकधूक वाढली: येणारे तीन महिने अधिक काळजीचे”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असताना रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आलेले असताना तिसऱ्या लाटेची

संभाव्य भिती देखील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग जरी वाढला असला, तरी तिसऱ्या लाटेला टाळायचं असेल, तर पुढील तीन महिने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.निर्बंध शिथिल करण्यात आले असले आणि लसीकरणाचा

वेग देखील वाढलेला असला, तरी करोनाचं संकट आणि त्याने उभी केलेलं आव्हानं अजून देखील संपलेली नाहीत, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संकटाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणं आवश्यक असल्याची गरज देखील व्यक्त करण्यात आली आहे.

“दिवसाला करोनाचे सरासरी २० हजार नवे बाधित आढळत आहेत. गेल्या आठवड्यात यापैकी ५६ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडले आहेत”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.दरम्यान, पुढील तीन महिन्यात विविध प्रकारचे सण असून या काळामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अधिक काळजी घेण्याचं आवाहन केंद्राकडून करण्यात आलं आहे. “ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात आपण अधिक सतर्क राहायला हवं. गर्दीची ठिकाणं किंवा विनाकारण प्रवास करणं आपण टाळायला हवं. घरी राहून व्हर्च्युअल पद्धतीने सण-उत्सव साजरे करावेत, ऑनलाईन शॉपिंग करावी”, असं आवाहन अग्रवाल यांनी केलं आहे.

सण-उत्सवांचा काळ जवळ येत असताना करोना रुग्णवाढीचे स्पाईक्स येण्याची भिती केंद्र सरकारने याआधीच व्यक्त केली आहे. तसेच, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेणं गरजेचं असून कोविड-१९ दूर ठेवण्यासाठी आवश्यक नियम पाळणं

आवश्यक असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. देशात आत्तापर्यंत ७१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून २७ टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!