Monday, October 18, 2021

नगर ब्रेकिंग:जनावरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली एक ठार तर एक जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कुठे जिवित हनी झाली आहे.अशा घटना समोर आली आहे.अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात समोर आली आहे.

टाकळी खातगाव (ता.नगर) येथे जनावरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली. या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे (वय 72) हे जागीच ठार झाले. तर गणपत सखाराम पिसे (वय 75) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाळवणी (ता. पारनेर) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भानुदास शेटे आणि गणपत पिसे (रा. टाकळी खातगाव, ता. नगर) हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघे ही नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.7) शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील राजमोहम्मद हसन शेख यांच्या गट नंबर 291 मध्ये गेले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला दुपारी साडे तीन वाजता सुरूवात झाली.

त्यातच पावणे चार वाजण्याच्या सुमारास या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला. त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते. गणपत पिसे हे जखमी झाले होते.

पिसे यांना उपचारासाठी भाळवणी (ता. पारनेर) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!