Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात भाजप आधी कोण सोडणार शिवाजी कर्डिले का सुजय विखे ? चर्चेला उधाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजी कर्डिले व्यासपीठावर एकत्र आले की त्यांची शाब्दिक चकमक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. याची प्रचिती अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे काल एका खासगी समारंभात आली.

या समारंभाला भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे व माजी शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार विखे पाटलांना त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर कोपरखळी मारली. विखेंनी केलेले वक्तव्य आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

या कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या उषा कराळे, केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक

ऋषिकेश ढाकणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, श्रीनिंबादैत्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, वेणूनाथ महाराज वेताळ, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी कर्डिले म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. या मिरी गावातच सुजय विखे भाजपत आले तर खासदार होतील असा विश्वास मी व्यक्त केला होता. यानंतर ते भाजपमध्ये आले आणि खासदार झाले. लवकरच ते केंद्रात मंत्री देखील होतील असा विश्‍्वास कर्डिले यांनी व्यक्त केला.

यावर खासदार विखे म्हणाले, मी केंद्रात मंत्री होईल पण त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये राहता ना. त्यावेळी कर्डिले म्हणाले जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं पण मला तुमचा पण भरोसा वाटत नाही त्यामुळे जाताना तुम्हाला पण सोबत घेऊन जाईल असे कर्डिले म्हणताच उपस्थितांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या.

खासदार विखे म्हणाले नगर येथे महामार्गाच्या उद्घाटनासाठी आलेले देशाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. तिथं श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी व्यासपीठावरच खुर्च्यांची ओढतान केली. विकास निधी कोणाचा, श्रेय घेण्यासाठी धडपडतोय कोण.

आमच्या सरकारने दिलेल्या निधीच श्रेय आम्हाला घेऊ द्या, अशा शब्दात खासदार विखे यांनी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीचा समाचार घेतला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!