Wednesday, October 27, 2021

महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातल्या अनेक भागातून मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाचा दौरा अद्याप पूर्ण शिल्लक आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार,

येत्या चार दिवसात महाराष्ट्र, गोव्यासह 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात

अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून

वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे.

याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!