Monday, October 25, 2021

नगर ब्रेकिंग:ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपुर राज्य मार्गावर रेल्वे पुलावर काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अवजड ट्रकने (क्रं.एम.एच.०४,ई.एल.८९९१) क्रं.एम.एच.२०

एफ.एस.७९६१) समोरून येणाऱ्या दुचाकीस (क्रं.एम.एच.२० एफ.एस.७९६१) दिलेल्या धडकेत रोशन गफूर शेख (वय-२६) रा.टापरगाव ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद या तरुणास जखमी करून फरार झाला आहे.त्यास उपचारास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता त्यास मयत घोषित केले आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,फिर्यादी जाफर नजीर शेख (वय-२८) चालक रा.खंडाळा ता.वैजापूर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करताना म्हटले आहे की,”आपण आपले सहकारी मयत रोशन शेख हे दि.०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी

साडे सहा वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी जात असताना समोरून येणाऱ्या वरील क्रंमाकाच्या ट्रकने त्यांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले आहे.

व त्यांस नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषीत केले आहे.या प्रकरणी फिर्यादी जाफर शेख यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी ट्रक चालका विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३०५/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,व

मोटार वाहन कायदा कलम १३४(अ),(ब),१८४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी पुंड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!