Sunday, October 24, 2021

नगर ब्रेकिंग:देवीचे पुजारी कुटुंब करोनाबाधित, दर्शन घेतलेल्या भाविकांचे टेन्शन वाढले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराजवळील बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिरातील पुजारी कुटुंब करोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. त्यांचा मंदिरामध्ये वावर असल्याचा आरोप बुऱ्हाणनगर ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गुरुवारी दर्शन घेतलेल्या

 शेकडो भाविकांची धाकधूक वाढली आहे. कुटुंबियांतील काहींना करोनाचं निदान झाल्याचं पुजारी अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी मान्य केलं. मात्र आम्ही योग्य ती खरबदारी घेत असल्याचं ते म्हणाले. गावकऱ्यांनी यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.भाविकांसाठी मंदिर गुरुवारी खुलं झालं आहे.

त्यातच हा प्रकार उघडकीस आला आहे.त्यांनी म्हटलं आहे की, संसर्ग झाल्यानंतरही पुजारी कुटुंब विलगीकरण कक्षामध्ये न जाता मंदिरामध्ये फिरत आहे. मंदिरात राज्यभरातून भाविक येतात. त्यामुळे त्यांना करोना संसर्गाचा धोका संभावतो. करोना रुग्ण वाढल्यास याची जबाबदार जिल्हा प्रशासनाची असेल, असे निवेदनात म्हटलं आहे.

वकील भगत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘आमच्या कुटुंबातील चौघांना करोना संसर्गाचं निदान झालं आहे. वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाला कारोना संसर्ग झाला आहे. मात्र आम्ही विलगीकरण कक्षात आहोत. भाविकांना आमच्यापासून

संसर्ग होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेत आहोत. आमच्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून पाहणी करावी. योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!