Saturday, October 23, 2021

लॉकडाउनचे हाल संपेनात नगर जिल्ह्यातील ही बातमी वाचली तुम्हाला ही वाईट वाटेल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील लॉकडाउनमध्ये झालेले हाल अद्याप नागरिक विसरलेले नाहीत. त्यातच नगर जिल्ह्यात आता नव्याने लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हाल होण्याची मालिका सुरूच राहिली आहे. त्यातही प्रशासनाच्या चुकीच्या आणि ताठर भूमिकेचा फटका बसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे गावात येणारे सर्व रस्ते बंद केल्याने वाहने येऊ शकत नाहीत. त्यामुळे रुग्णाला खांद्यावर घेऊन येण्याची वेळ परिसरातील ग्रामस्थांवर आली. हे चित्र पाहून आता गावातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या मोठ्या गावातील हे चित्र आहे. रुग्णसंख्या वाढल्याने तेथे कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यासाठी गावात येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. मात्र, परिसरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर खासगी रुग्णालये याच गावात आहेत.

बाहेरून येणारी वाहने गावाबाहेरच अडविली जात आहेत. त्यामुळे वस्तीवरील लोकांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे. गुरूवारी अशाच एका रुग्णाला खांद्यावरून नेते जात असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यावरून गावातून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांची तक्रार आहे की, रस्ते बंद करून तेथे

पोलिस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या ताठर भूमिकेमुळे रुग्णांना घेऊन येणारी वाहनेही आत सोडली जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे.यासंबंधी टाकळी ढोकेश्वर गावातील व्यावसायिक संतोष सोनावळे म्हणाले, ‘वास्तविक पहाता प्रशासनाने चुकीचे निकष लावून लॉकडाउन केला आहे.

गावठाणात रुग्ण नाहीत. जे रुग्ण मोजले ते परिसरात आणि वस्त्यांवर आहेत. तेवढा भाग बंद करणे आवश्यक असताना प्रशासनाने गावच बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत. या गावांना कंटेन्मेंट झोनचे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे रस्ते बंद करावे लागतात.

मात्र, आपतकालीन परिस्थितीसाठी एक रस्ता मोकळा ठेवणे आणि तेथून रुग्णांना प्रवेश देण्याची सोय केली जाते. याची अंलबजावणी करताना गडबड झाल्याने रुग्णांवर ही वेळ ओढावली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रच बंद केलेल्या गावात अडकले असल्याने परिसरासाठी पर्यायी व्यवस्था, त्यासाठी रुग्णवाहिकेची

सोय करणेही आवश्यक होते. मात्र, याकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींकडून यासंबंधी सोयीसुविधा करण्याकडे दुर्लक्षच झाल्याचे या चित्रावरून दिसून येते.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!