Monday, October 18, 2021

मुळा उजव्या कालव्याची जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पहाणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील कौठा ते देडगाव लालगेट परिसरातील मुळा उजवा कालव्याचे भरावाची माती वारंवार घसरून पाणी वहनास अडथळा निर्माण होऊन कालव्याची वहन क्षमता कमी होत असल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव व इतर अधिकाऱ्यांचे पथकाने गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन कौठा परिसरातील मुख्य कालव्याची पहाणी केली.

दि 29 सप्टेंबर रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी करून कौठा परिसरात वारंवार कालवा खचण्याचे प्रकाराकडे ना.पाटील यांचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेत तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,अहमदनगर मुळा बंधारे विभागाच्या कार्यकारी सायली पाटील, तांत्रिक सल्लागार अमित बारटक्के, उपअभियंता बाळासाहेब भापकर, उपअभियंता प्रवीण दहातोंडे यांचे पथकाने गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील कौठा परिसरात मुळा उजवा कालवा मैल 35 ते मैल 45 दरम्यान पहाणी केली.या परिसरात काळी-खलगट जमीन असल्याने कालव्याच्या दोन्ही बाजूच्या भरावासाठी वापरलेली माती वारंवार कालव्यामध्ये घसरते त्यामुळे कालव्यात मातीचे ढिगारे तयार होऊन पाणी वहनास आढथळा निर्माण होऊन पुढील भागाकडे पाहिजे त्या क्षमतेने पाणी प्रवाहित होत नाही आणि कालवा फुटण्याची शक्यता निर्माण होते.असे होत असल्याने लालगेट पासून सुरू होणाऱ्या ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँचवरील सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होत नाही, पर्यायाने आवर्तनाचा कालावधी वाढतो व पाणी वाया जाते.या कालव्याचे काम करण्याचे दृष्टीने जलसंपदा विभागाच्या पथकाने या कालव्याची पहाणी केली.लवकरच याबाबदचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!