Sunday, October 17, 2021

डॉ. रवींद्र ठाकुर नगरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदावर डॉ. रवींद्र ठाकुर यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर या पदाचा कार्यभार घेतला.

डॉ.रवींद्र ठाकूर यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून वृत्त शाखेत कार्यरत होते. डॉ.ठाकुर यांची सन 2006 पासून जिल्हा माहिती अधिकारी, रायगड (अलीबाग) या कार्यालयात माहिती अधिकारी या पदावर शासकीय सेवेची सुरूवात झाली. त्यानंतर 2009 ते 2011 या कालावधीत माहिती व जनसंपर्क विभागात मुंबई येथे सहायक संचालक पदावर त्यांनी काम केले. 2011 ते 14 या कालावधीत नाशिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी पदावर त्यांनी काम केले. सन 2014 ते 2016 या कालावधीत औरंगाबाद येथील संचालक (माहिती) कार्यालयात सहायक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 2016 पासून पुन्हा मुंबई येथे वृत्तशाखेत सहायक संचालक (माहिती) म्हणून कार्यरत होते.
श्री. ठाकुर हे मुळचे जळगांव येथील असून त्यांचे महाविद्यालयीन व पत्रकारितेतील शिक्षण जळगांव व पुणे येथे झाले आहे. त्यांनी पत्रकारिता (जनसंपर्क) विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी संपादन केली आहे. डॉ ठाकुर यांनी, वृत्तपत्रात, आकाशवाणी या माध्यम क्षेत्रात काम केले असून पत्रकारिता विभागात प्राध्यापक म्हणून ही काम केले आहे. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी वरिष्ठ लिपिक संतोष गुजर, सिनेयंत्रचालक धनंजय जगताप, कनिष्ठ लिपिक सुरज लचके, वाहनचालक अरुण सोनवणे उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ.ठाकुर यांनी उपमाहिती कार्यालय, शिर्डी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. यावेळी माहिती सहायक जयंत करपे, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे, कनिष्ठ लिपिक प्रविण पाटील उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!