Friday, October 22, 2021

अजित पवार खोटं बोलतात:शालिनी पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. त्यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

या प्रकरणी माजी मंत्री शालिनी पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा

दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.न्यायालयात माझी लढाई सुरुचअजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत.

न्यायालयात माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असंही शालिनी पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!