Monday, October 25, 2021

रेल्वेमध्ये परीक्षा न देता मिळवा नोकरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम-मध्य रेल्वेच्या भरती सेलनं अॅप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवार कोणतीही परीक्षा न देता ही नोकरी मिळवू शकतो. या प्रक्रियेतून अॅप्रेंटिसच्या 2226 जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी नोंदणी प्रक्रिया 11 ऑक्टोबरपासून सुरू होत असून, अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल.याशिवाय, रेल्वे भरती सेलकडून (Railway Recruitment cell) पूर्व विभागातल्या अॅप्रेंटिस पदांवर मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून 3366 पदं भरली जाणार आहेत.

या पदांच्या भरतीसाठी आजपासून (8 ऑक्टोबर) अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आरसीसीच्या www. rrcer.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online) अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2021 रोजी

सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. फी जमा करण्याची अंतिम मुदत हीच असेल. यासाठीची गुणवत्ता यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी घोषित करण्यात येईल.अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवाराला सर्वप्रथम wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

त्यानंतर वेबसाइटवरच्या अर्जावर क्लिक करावं लागेल. त्यात मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर कागदपत्रं सबमिट करावी लागतील. फोटो आणि सही अपलोड करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढावी लागेल.

या प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि महिला हे वगळता अन्य सर्व उमेदवारांकरिता 100 रुपये अर्ज शुल्क असेल. हे शुल्क देण्यासाठी उमेदवार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, ई-वॉलेटचा वापर करू शकतात.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!